४२ वर्षीय व्‍यक्‍तीने विहिरीत घेतला गळफास!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीवरील लोखंडी खिराडीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना हिवरा खुर्द (ता. मेहकर) येथे २२ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास समोर आली. भुजंग विश्वनाथ कुटे (रा. हिवरा खुर्द) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह विहिरीत फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. जानेफळ पोलीस …
 
४२ वर्षीय व्‍यक्‍तीने विहिरीत घेतला गळफास!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीवरील लोखंडी खिराडीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन ४२ वर्षीय व्‍यक्‍तीने आत्‍महत्‍या केली. ही घटना हिवरा खुर्द (ता. मेहकर) येथे २२ ऑगस्टला दुपारी दोनच्‍या सुमारास समोर आली.

भुजंग विश्वनाथ कुटे (रा. हिवरा खुर्द) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. त्‍यांचा मृतदेह विहिरीत फाशी घेतलेल्या अवस्‍थेत लटकलेला आढळला. जानेफळ पोलीस ठाण्यात त्‍यांचे चुलतभाऊ मंगेश कडूबा कुटे (३८) यांनी माहिती दिली. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी कर्जबाजारीपणातून आत्‍महत्‍या केल्याची चर्चा गावात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस आणि ग्रामस्‍थांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनील उतपुरे, संजय उतपुरे, उत्तम खरात आदींनी सहकार्य केले. तपास जमादार इर्शाद पटेल व अमोल बोर्डे करत आहेत.