१५ वर्षीय मुलाचे अपहरण!; देऊळगावराजा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव तालुक्यातील असोला जहाँगीर येथील १५ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणाची तक्रार त्याच्या वडिलांनी २७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल दामोधर शेळके (रा. असोला जहाँगीर, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ ऑगस्ट …
 
१५ वर्षीय मुलाचे अपहरण!; देऊळगावराजा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव तालुक्यातील असोला जहाँगीर येथील १५ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणाची तक्रार त्याच्या वडिलांनी २७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून अज्ञात व्यक्‍तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल दामोधर शेळके (रा. असोला जहाँगीर, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ ऑगस्ट रोजी ते त्यांची दोन मुले आदित्य (१५) व शुभम (१२) शेतात फवारणीचे काम करत होते. दुपारी १२ वाजता आदित्य घरून आपली गाडी घेऊन येतो, असे म्हणाला व घरी गेला. मात्र तो शेतात परतला नाही. संध्याकाळी आदित्यचे आई- वडील घरी गेले. तेव्हा त्यांना मोटारसायकल व आदित्य घरात दिसला नाही. सर्वत्र चौकशी करून, नातेवाइक व मित्रांकडे शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या वडिलांनी काल देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.