शेगाव संस्‍थानबद्दल द्वेषभावना ठेवणाऱ्याला चपराक!; आनंदसागरविरुद्धची याचिका निकाली; याचिकाकर्त्यालाच १० हजार रुपयांचा दंडही!!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील आनंदसागरविरुद्ध दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल, १५ सप्टेंबर रोजी निकाली काढली. आनंदसागरविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या अशोक गारमोडे यांना न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशोक गारमोडे हे संस्थानमध्ये सेवेकरी होते. त्यांना संस्थेच्या दुसऱ्या ठिकाणी सेवा देण्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली …
 
शेगाव संस्‍थानबद्दल द्वेषभावना ठेवणाऱ्याला चपराक!; आनंदसागरविरुद्धची याचिका निकाली; याचिकाकर्त्यालाच १० हजार रुपयांचा दंडही!!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील आनंदसागरविरुद्ध दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल, १५ सप्टेंबर रोजी निकाली काढली. आनंदसागरविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या अशोक गारमोडे यांना न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अशोक गारमोडे हे संस्थानमध्ये सेवेकरी होते. त्यांना संस्थेच्या दुसऱ्या ठिकाणी सेवा देण्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रारदार संस्थानचे नोकरदार नसून, सेवेकरी असल्याने तक्रार बेकायदेशीर असल्याचे सांगत औद्योगिक न्यायालयाने तक्रार खारीज केली होती. त्यानंतर खारमोडे यांनी २०१९ मध्ये आनंदसागर व सौंदर्यीकरणाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणात संस्थानला प्रतिवादी करण्यात यावे, असा अर्ज संस्थानने उच्च न्यायालयात केला होता. न्यायालयाने याचिकाकर्ते गारमोडे यांना याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र गारमोडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. सुनावणीदरम्यान गारमोडे सतत गैरहजर राहत होते. दुसरीकडे संस्थानने उच्‍च न्‍यायालयात उत्तर दाखल केले. त्यामुळे याचिकाकर्त्याने द्वेषभावनेतून याचिका दाखल केल्याने न्यायालयाने याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांनी हा निकाल दिला. संस्थांनतर्फे ॲड. अरुण पाटील यांनी काम पाहिले.