विवाहितेसह दोन तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत एका विवाहितेसह दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. जळगाव जामोद येथील रामनगर येथील सौ. लक्ष्मी हरिदास कंकाळे ही २६ वर्षीय विवाहिता घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चांदुरबिस्वा (ता. नांदुरा) …
 
विवाहितेसह दोन तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसांत एका विवाहितेसह दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. जळगाव जामोद येथील रामनगर येथील सौ. लक्ष्मी हरिदास कंकाळे ही २६ वर्षीय विवाहिता घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चांदुरबिस्वा (ता. नांदुरा) येथील कु. योगिता गजानन सपकाळ ही १८ वर्षीय तरुणी हरवली असून, ती बेपत्ता झाल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. टाकळी विरो (ता. जलंब) येथील १९ वर्षीय कु. कीर्ती कैलास शेगोकार ही तरुणी बेपत्ता झाली असून, ती हरवल्याची तक्रार जलंब पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.