राहत्या घरात शेतमजुराने घेतला गळफास; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतमजुराने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना भादोला (ता. बुलडाणा) येथे आज, ४ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास घडली. किशोर विश्वनाथ नेमाने (३२) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव आहे. ते आचारी म्हणूनही काम करायचे. आज दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी खिडकीच्या गजाला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतला. त्यांच्या …
Oct 4, 2021, 19:25 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतमजुराने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना भादोला (ता. बुलडाणा) येथे आज, ४ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास घडली. किशोर विश्वनाथ नेमाने (३२) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव आहे. ते आचारी म्हणूनही काम करायचे. आज दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी खिडकीच्या गजाला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. बातमी लिहीपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी विश्वनाथ पांडुरंग नेमाने (६२) यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.ना. जनार्दन इंगळे करत आहेत.