येळगाव धरणात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह! कालपासून सुरू होता शोध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ८ सप्टेंबरपासून घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आज, १० सप्टेंबर रोजी सकाळी येळगाव धरणात सापडला. सूरज सुभाष भोसले(२४, रा. राजपूत ले आउट बुलडाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.सूरज ८ सप्टेंबर रोजी घरून बेपत्ता झाला होता. त्याचा फोन त्याने घरीच ठेवला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सूरज एकाएकी बेपत्ता झाल्याने त्याच …
 
येळगाव धरणात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह! कालपासून सुरू होता शोध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ८ सप्टेंबरपासून घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आज, १० सप्टेंबर रोजी सकाळी येळगाव धरणात सापडला. सूरज सुभाष भोसले(२४, रा. राजपूत ले आउट बुलडाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सूरज ८ सप्टेंबर रोजी घरून बेपत्ता झाला होता. त्याचा फोन त्याने घरीच ठेवला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सूरज एकाएकी बेपत्ता झाल्याने त्याच दिवशी रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. काल, ९ सप्टेंबर रोजी सकाळी येळगाव धरणाच्या काठावर त्‍याचे कपडे व मोटारसायकल आढळली होती. त्यामुळे काल दिवसभर शोध घेऊनही सूरज सापडला नव्हता. रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी त्‍याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसला. ही माहिती पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.