भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार, लोणार तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली. ही घटना काल, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास औरंगाबाद- नागपूर महामार्गावरील पिंपरी खंदारे गावाजवळ घडली. शोभा मधुकर नवघरे(५५,रा पिपरी खंदारे ता लोणार) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शोभा खंदारे या शेतातील काम आटोपून भावासोबत दुचाकीने घराकडे जात …
 
भरधाव टिप्परने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार, लोणार तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली. ही घटना काल, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास औरंगाबाद- नागपूर महामार्गावरील पिंपरी खंदारे गावाजवळ घडली.

शोभा मधुकर नवघरे(५५,रा पिपरी खंदारे ता लोणार) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शोभा खंदारे या शेतातील काम आटोपून भावासोबत दुचाकीने घराकडे जात होत्या. त्यावेळी बिबीकडून रेती घेऊन मेहकरकडे जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला मागून जबर धडक दिली. त्‍या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ जखमी झाला. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळवरून फरारी झाला. बिबी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.