बुलडाण्यातील सुंदरखेडच्‍या ऑटो स्‍टॉपवरून तरुण, सोळंके हॉस्पिटलमधून ४२ वर्षीय व्‍यक्‍ती गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्यांत आणखी चौघांची भर पडली आहे. यात दोन तरुणांसह एक तरुणी व एका ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पुंजाजी केशव लाजने (४२) हे बुलडाण्याच्या सोळंके हॉस्पिटलमधून बेपत्ता झाले आहेत. ते हरवल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ७ सप्टेंबरला दाखल झाली आहे. सुंदरखेड ऑटो स्टॉपवरून जीवन गजानन गव्हाळे …
 
बुलडाण्यातील सुंदरखेडच्‍या ऑटो स्‍टॉपवरून तरुण, सोळंके हॉस्पिटलमधून ४२ वर्षीय व्‍यक्‍ती गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्यांत आणखी चौघांची भर पडली आहे. यात दोन तरुणांसह एक तरुणी व एका ४२ वर्षीय व्‍यक्‍तीचा समावेश आहे.

पुंजाजी केशव लाजने (४२) हे बुलडाण्याच्‍या सोळंके हॉस्पिटलमधून बेपत्ता झाले आहेत. ते हरवल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ७ सप्‍टेंबरला दाखल झाली आहे. सुंदरखेड ऑटो स्‍टॉपवरून जीवन गजानन गव्हाळे (१९) हा गायब झाल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल करण्यात आली आहे. जळगाव जामाेद तालुक्‍यातील वडगाव गड येथून शारदा प्रकाश अप्पाकळदळे ही २३ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार ६ सप्‍टेंबरला जळगाव जामोद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. किन्होळा येथून १८ वर्षीय रूतिक भालचंद्र वैराळकर हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार धामणगाव बढे पोलीस ठाण्यात ६ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे.