बुलडाणा शहरातून आणखी एक तरुणी बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल, १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. वैष्णवी शालीग्राम मोरे (रा. गौतमनगर, धामणधरी, बुलडाणा) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी सात वाजता सामान आणायला …
 
बुलडाणा शहरातून आणखी एक तरुणी बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल, १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

वैष्णवी शालीग्राम मोरे (रा. गौतमनगर, धामणधरी, बुलडाणा) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी सात वाजता सामान आणायला जाते असे म्हणत वैष्णवी घरून निघून गेली. रात्री ९ पर्यंत ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. तिच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र तरीही तिचा शोध लागला नाही. दोन दिवस सगळीकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने वैष्णवीचे वडील शालीग्राम मोरे यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.