बुलडाणा लाइव्ह स्पेशल! पैसेवारीत “नजर’ आला दुष्काळ!! जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 65; सोयाबीन 67

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुलाब चक्रीवादळाने जिल्ह्यातील उरलासुरला खरीप हंगाम उद्ध्वस्त केला असतानाच कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची प्राथमिक स्थिती दर्शविणाऱ्या नजर अंदाज पैसेवारीचा अहवाल आज, ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आलाय! निसर्ग व गुलाबच्या झंझावातापूर्वीचा हा पाहणी अहवाल असला तरी यातून संभाव्य ओला दुष्काळ “नजर’ आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्याची सरासरी …
 
बुलडाणा लाइव्ह स्पेशल! पैसेवारीत “नजर’ आला दुष्काळ!! जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 65; सोयाबीन 67

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुलाब चक्रीवादळाने जिल्ह्यातील उरलासुरला खरीप हंगाम उद्‌ध्वस्त केला असतानाच कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची प्राथमिक स्थिती दर्शविणाऱ्या नजर अंदाज पैसेवारीचा अहवाल आज, ३० सप्‍टेंबरला जाहीर करण्यात आलाय! निसर्ग व गुलाबच्या झंझावातापूर्वीचा हा पाहणी अहवाल असला तरी यातून संभाव्य ओला दुष्काळ “नजर’ आला आहे.

या अहवालानुसार जिल्ह्याची सरासरी नजर अंदाज पैसेवारी 65 पैसे इतकी निघाली आहे. घाटावरील तालुक्यांच्या तुलनेत घाटाखालील बहुतेक तालुक्यातील खरीप हंगामाची स्थिती बिकट असल्याचे स्पष्ट होते. पैसेवारीचे तालुकानिहाय आकडे असे ः बुलडाणा 70 पैसे, चिखली 69, देउळगाव राजा 68, मेहकर 72, लोणार 71, सिंदखेड राजा 72, मलकापूर 54, मोताळा 53, नांदुरा 54, खामगाव 67, शेगाव 64, जळगाव जामोद 56, संग्रामपूर 57, सरासरी 65 पैसे.

पीकनिहाय पैसेवारी
दरम्यान, जिल्ह्यातील 3 प्रमुख खरीप पिकांची पैसेवारी सुद्धा झालेला अनर्थ थोडाफार दर्शविणारी आहे. पावणेचार लाख हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबीनची पैसेवारी 67 इतकी निघाली आहे. कपाशी 60 तर मका पिकाची 56 पैसे इतकी निघाली आहे.