बुलडाणा तालुक्‍यात दोनच दिवसांत अकराशे हेक्टरवरील पिकांची नासाडी! दीड हजार शेतकऱ्यांना फटका!!

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या पावसाने बुलडाणा तालुक्यात केवळ दोनच दिवसांत 1143 हेक्टरवरील खरीप पिकांची अतोनात नासाडी करून हजारो शेतकऱ्यांना जबर फटका दिला! यामुळे या हवालदिल शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची आतुर प्रतीक्षा लागली आहे. मागील 6 व 7 सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यात कोसळधार पावसाने कहर केला. यामुळे …
 
बुलडाणा तालुक्‍यात दोनच दिवसांत अकराशे हेक्टरवरील पिकांची नासाडी! दीड हजार शेतकऱ्यांना फटका!!

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या पावसाने बुलडाणा तालुक्‍यात केवळ दोनच दिवसांत 1143 हेक्टरवरील खरीप पिकांची अतोनात नासाडी करून हजारो शेतकऱ्यांना जबर फटका दिला! यामुळे या हवालदिल शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची आतुर प्रतीक्षा लागली आहे.

मागील 6 व 7 सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यात कोसळधार पावसाने कहर केला. यामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिके, बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. यानंतर जिल्ह्याचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या माध्यमाने शासनाला सादर करण्यात येईल.

दृष्टीक्षेपात हानी
दरम्यान, या अहवालानुसार फळबागा वगळता 1136.67 हेक्टरवरील जिरायत पिकांची हानी झाली. याचा 1585 शेतकऱ्यांना फटका बसल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. याशिवाय फळबागा सोडून 7.10 हेक्टरवरील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले असून, 11 बागायतदारांना तडाखा बसला. या आपत्तीमुळे फळबागांचे मात्र नुकसान झाले नाही, असे खंडारे यांनी स्पष्ट केले. एकूण 1596 कास्तकारांच्या 1143.77 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.