फर्निचरचे काम करण्यासाठी आलेल्या परप्रांतियांनी लांबवले दीड लाखाचे दागिने; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्थानिक कामगारांना सोडून परप्रांतियांना फर्निचरचे काम देणे बुलडाणा शहरातील वृद्धाला चांगलेच महागात पडले. या परप्रांतिय कामगारांनी तब्बल पावणेदोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून, ते पसार झाले आहेत. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी तक्रार दाखल झाल्याने बिहारच्या तीन संशयित कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विष्णूवाडीत समोर आली …
 
फर्निचरचे काम करण्यासाठी आलेल्या परप्रांतियांनी लांबवले दीड लाखाचे दागिने; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्‍थानिक कामगारांना सोडून परप्रांतियांना फर्निचरचे काम देणे बुलडाणा शहरातील वृद्धाला चांगलेच महागात पडले. या परप्रांतिय कामगारांनी तब्‍बल पावणेदोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून, ते पसार झाले आहेत. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी तक्रार दाखल झाल्याने बिहारच्या तीन संशयित कामगारांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विष्णूवाडीत समोर आली आहे.

सुधीर वासुदेव काळे (६२, रा. विष्णूवाडी, जैस्वाल ले आउट, बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. शिवाजी ठाकूर, पिंटूकुमार ठाकूर, अनिल कुमार ठाकूर (सर्व रा. सीतामंडी बिहार) अशी संशयितांची नावे आहेत. सुधीर काळे यांनी घरात फर्निचर करण्यासाठी या परप्रांतिय कामगारांना बोलावले होते. त्‍यांनी २३ जुलै ते २ सप्टेंबरदरम्‍यान काम केले. या काळात काळे यांनी त्यांचे सोन्याचे दागिने बँक लॉकरमध्ये ठेवले होते.

फर्निचरचे काम झाल्यानंतर त्‍यांनी बँक लॉकरमधून सोन्याचे दागिने काढून आणले व पाहणी केली असता लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्याआधी नजरचुकीने त्यातील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने घरातील कपाटातच राहिल्याचे लक्षात आले. त्‍यामुळे त्‍यांनी कपाटाची पाहणी केली. मात्र कपाटात दागिने दिसून आले नाहीत. तीन कामगारांनी ते चोरून नेल्याचे त्‍यांना समजले. पोहेकाँ भगवान शेवाळे यांनी काल, ८ ऑक्‍टोबरला सायंकाळी गुन्‍हा दाखल करून घेतला. तपास पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू करत आहेत.