पती नसताना घरी येऊन विवाहितेला विचारायचा, घरचे कोठे गेले, जेवण झालं का, काय चालू आहे?; तिने सासूला सांगितले….नंतर झाला “राडा’

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती नसताना तो तिच्या घरी यायचा…तिच्याकडे नको त्या चौकशा करायचा… “घरचे कुठे गेले, जेवण झालं का, काय चालू आहे…’ सलगी वाढविण्यासाठी त्याचा हा त्रास नेहमीचाच झाल्याने अखेर तिने वैतागून सासूला सांगितले. त्याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासूवर प्राणघातक हल्ला झाला. यात सासू गंभीर जखमी झाली आहे. ही …
 
पती नसताना घरी येऊन विवाहितेला विचारायचा, घरचे कोठे गेले, जेवण झालं का, काय चालू आहे?; तिने सासूला सांगितले….नंतर झाला “राडा’

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती नसताना तो तिच्‍या घरी यायचा…तिच्याकडे नको त्‍या चौकशा करायचा… “घरचे कुठे गेले, जेवण झालं का, काय चालू आहे…’ सलगी वाढविण्यासाठी त्‍याचा हा त्रास नेहमीचाच झाल्याने अखेर तिने वैतागून सासूला सांगितले. त्‍याच्‍या घरी जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासूवर प्राणघातक हल्ला झाला. यात सासू गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ७ ऑगस्‍टला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) येथे घडली. विवाहितेच्‍या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी युवकासह चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

रुपेश सुधाकर वानखेडे, सुधाकर भिवसन वानखेडे, मायावती सुधाकर वानखेडे, मनिषा सुधाकर वानखेडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात देऊळगाव साकर्शा येथील ३० वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिच्‍या घरी रुपेश वानखेडे कुणी नसताना येत होता व सलगी वाढविण्याच्‍या उद्देशाने त्रास देत होता. तिने त्‍याला वारंवार सांगितले की तू माझ्या घरी कुणी नसताना येत जाऊ नको. मात्र त्‍याने ऐकले नाही, असे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यामुळे तिने ही बाब सासूला सांगितली. त्‍यामुळे तिच्‍या सासूने रुपेशचे घर गाठले व त्‍याच्‍या घरच्‍यांना जाब विचारला. ७ ऑगस्‍टला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास रूपेशच्‍या घरचे विवाहितेच्‍या घरी आले. रुपेशबद्दल खोटे का सांगता, संशय का घेता असे म्‍हणून अश्लील शिविगाळ त्‍यांनी सुरू केली. रुपेश कुऱ्हाड घेऊन आला व विवाहितेच्‍या सासूच्‍या डोक्‍यात मारून जखमी केले. त्‍यांच्‍यावर बुलडाण्यातील सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.