देवाचं दार उघडलं… पहिल्याच दिवशी शेगावी “श्री’चरणी हजारो भाविक लीन!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद असलेली देवाची दारे आज, ७ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या परवानगीमुळे उघडण्यात आली. विदर्भाची पंढरी शेगावी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्रीचरणी लीन झाले. सध्या मंदिर प्रशासनाकडून रोज नऊ हजार भाविकांना दर्शनासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात येणार …
 
देवाचं दार उघडलं… पहिल्याच दिवशी शेगावी “श्री’चरणी हजारो भाविक लीन!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद असलेली देवाची दारे आज, ७ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या परवानगीमुळे उघडण्यात आली. विदर्भाची पंढरी शेगावी श्री संत गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्रीचरणी लीन झाले.

देवाचं दार उघडलं… पहिल्याच दिवशी शेगावी “श्री’चरणी हजारो भाविक लीन!

सध्या मंदिर प्रशासनाकडून रोज नऊ हजार भाविकांना दर्शनासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोरोना संकटामुळे दीड वर्षे केवळ मंदिराच्या प्रवेशद्वारावरूनच दर्शन घेता येत होते. आज मंदिर उघडल्याने मंदिर परिसरातील हार, फुले प्रसादाची दुकाने, हॉटेलसुद्धा उघडल्या आहेत. त्‍यामुळे दुकानदारांच्या चेहऱ्यावरही आनंद होता. प्रत्येकाचे ई- पास तपासून, हातावर सॅनिटायझर फवारून शिस्तबद्ध वातावरणात भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येकाला मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने भाविकांना महाप्रसादाची सुविधा सुद्धा आजपासून सुरू करण्यात आली आहे.