देऊळगाव महीच्या अल्पवयीन मुलाला भीक मागण्यासाठी विकले; ५० हजारांत सौदा; विकत घेणाऱ्या मायलेकी करत होत्या मारहाण

देऊळगाव राजा/ औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लहान मुलांना त्यांच्या आई- वडिलांकडून विकत घेऊन मारहाण करत भीक मागायला प्रवृत्त करण्याचा धंदा औरंगाबाद शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसांनी दोन मायलेकींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुटका केलेल्या दोन बालकांपैकी एक ५ वर्षीय बालक देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील असून, त्याच्या आई-वडिलांनासुद्धा …
 
देऊळगाव महीच्या अल्पवयीन मुलाला भीक मागण्यासाठी विकले; ५० हजारांत सौदा; विकत घेणाऱ्या मायलेकी करत होत्या मारहाण

देऊळगाव राजा/ औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लहान मुलांना त्यांच्या आई- वडिलांकडून विकत घेऊन मारहाण करत भीक मागायला प्रवृत्त करण्याचा धंदा औरंगाबाद शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी औरंगाबादच्‍या मुकुंदवाडी पोलिसांनी दोन मायलेकींना अटक केली आहे. त्‍यांच्‍या ताब्‍यातून सुटका केलेल्या दोन बालकांपैकी एक ५ वर्षीय बालक देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील असून, त्‍याच्‍या आई-वडिलांनासुद्धा आज, ४ सप्‍टेंबरला पोलिसांनी ताब्‍यात घेत चौकशी सुरू केली आहे.

जनाबाई उत्तम जाधव (५९) आणि सविता संतोष पगारे (३३, दोन्ही रा. रामनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या प्रकरणात अटक केलेल्या मायलेकींची नावे आहेत. २ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज वीर यांना त्यांच्या एका नातेवाईक महिलेने माहिती दिली की, दोन मायलेकी एका ५ वर्षीय मुलाला रामनगर येथे मारहाण करत आहेत. माहिती कळताच वीर यांनी महिलेच्या तावडीतून मुलाची सुटका केली होती व पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी दोघी मायलेकींना पोलीस ठाण्यात आणले.

विश्वासात घेऊन लहान मुलाची विचारपूस केली. त्यावेळी त्याने “त्या’ दोघींनी भीक मागण्यासाठी विकत आणल्याचे सांगितले. घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्या चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ समोर आला असून, त्यात दोघी त्याला भीक मागायला लावतात. मारहाण करतात, असे तो सांगतो. भीक मागायला नकार दिल्याने त्या लहानग्याला मारहाण करीत होत्या. त्या मायलेकीकडून आणखी एका २ वर्षांच्या चिमुकल्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले असून, तो अमरावती येथील असल्याचे समजले. देऊळगाव मही येथील ५ वर्षांच्या मुलाला ५० हजार रुपयांत विकत घेण्यात आले होते. तसा लेखी करारही १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर करून घेतला होता, अशी कबुली आरोपी महिलांनी पोलिसांत दिली आहे.