ट्रॉलीतून पडून चाक अंगावरून गेले; मजूर जागीच ठार, महिन्याने झाला गुन्‍हा दाखल

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पडून अंगावरून चाक गेल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना २१ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी काल, १८ ऑगस्टला बोराखेडी पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर ऊर्फ नामदेव शंकर सपकाळ असे मृतकाचे नाव आहे. नीना शंकर सपकाळ (३५, रा. दाताळा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. पवन …
 
ट्रॉलीतून पडून चाक अंगावरून गेले; मजूर जागीच ठार, महिन्याने झाला गुन्‍हा दाखल

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्‍टरच्‍या ट्रॉलीतून पडून अंगावरून चाक गेल्याने मजुराचा मृत्‍यू झाल्याची घटना २१ जुलैला सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली होती. या प्रकरणी काल, १८ ऑगस्‍टला बोराखेडी पोलिसांनी ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

रामेश्वर ऊर्फ नामदेव शंकर सपकाळ असे मृतकाचे नाव आहे. नीना शंकर सपकाळ (३५, रा. दाताळा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. पवन संतोष सोनोने (रा.दाताळा ता. मलकापूर) असे ट्रॅक्‍टरचालकाचे नाव आहे. दाताळा ते शेलगाव बाजार रोडवरील डिपीजवळ ही घटना घडली होती. रामेश्वर हा शेलगाव बाजार येथून ट्रॅक्टरमधील विटा खाली करून येत असताना पवनने ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव व निष्काळजीपणे चालवून रामेश्वरच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरला. रामेश्वर पडल्याने त्याच्‍या उजव्‍या दंडावरून ट्राॅलीचे चाक गेले. त्‍याला मलकापूरच्‍या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तपासून डॉक्‍टरांनी मृत घोषित केले होते. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. तायडे करत आहेत.