टाटा मोटर्स कार देणार का, सायबर पोलीस म्‍हणतात, फुकटात कुणी कार देईल का?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टाटा समूहाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक लिंक आज, १ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समूहातर्फे भाग्यवान विजेत्यांना कार बक्षीस मिळेल, असे आमिष त्यात दाखवण्यात आले आहे. यासंदर्भात बुलडाणा सायबर क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशा लिंक फ्रॉड असतात. …
 
टाटा मोटर्स कार देणार का, सायबर पोलीस म्‍हणतात, फुकटात कुणी कार देईल का?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टाटा समूहाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक लिंक आज, १ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समूहातर्फे भाग्यवान विजेत्यांना कार बक्षीस मिळेल, असे आमिष त्यात दाखवण्यात आले आहे. यासंदर्भात बुलडाणा सायबर क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशा लिंक फ्रॉड असतात. या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे अशा लिंकपासून दूर राहावे, असे आवाहन त्‍यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाले.

कुणी फुकटात कशाला कार देईल, याचा विचार नागरिकांनी करायला हवा. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. अशा लिंकमध्ये तुम्हाला बक्षीस मिळाल्याचे दाखवले जाते. त्यानंतर कार तुम्हाला घरपोच देण्यासाठी काही रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले जाते. अतिउत्साहात काही लोक त्यात फसतात, असे श्री. दुधाळ म्हणाले.
टाटा मोटर्सचे स्पष्टीकरण…
टाटा मोटर्सची अशा प्रकारे बक्षीस देण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्टीकरण टाटा मोटर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आल्याने शेअर होणारी लिंक पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आली आहे.