चिखलीच्‍या बसस्‍थानक भागातून चौधरींचे गाय-वासरू चोरले!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानक भागातील रहिवासी अतुल चौधरी यांचे आशीर्वाद मेडिकलसमोर भगवती स्वीट मार्ट आहे. त्यांच्याकडे गाय आणि वासरू होते. ती दुकानाच्या मागे बांधलेली असायची. मात्र पांढऱ्या चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्यांची गाय व वासरू वाहनात घालून नेले आहे. ही घटना ४ ऑगस्टच्या सकाळी समोर आली. काळी गावरान जातीची गाय (वय ५ वर्षे) व …
 
चिखलीच्‍या बसस्‍थानक भागातून चौधरींचे गाय-वासरू चोरले!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्‍थानक भागातील रहिवासी अतुल चौधरी यांचे आशीर्वाद मेडिकलसमोर भगवती स्वीट मार्ट आहे. त्‍यांच्‍याकडे गाय आणि वासरू होते. ती दुकानाच्‍या मागे बांधलेली असायची. मात्र पांढऱ्या चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्‍यांची गाय व वासरू वाहनात घालून नेले आहे. ही घटना ४ ऑगस्‍टच्‍या सकाळी समोर आली.

काळी गावरान जातीची गाय (वय ५ वर्षे) व तिला एक वासरी लाल रंगाची व तिच्‍या डोक्यावर समोरील बाजूस पांढरा टिका असलेली वासरी (वय अंदाजे १ वर्ष) दुकानामागे बांधलेली होती. ३ ऑगस्‍टला रात्री गाय व वासरीचा चारापाणी करून चौधरी घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्‍ही जनावरे आढळली नाहीत. शेजारील व्‍यक्‍तीने सांगितले, की ४ ऑगस्‍टला पहाटे पावणेतीनच्‍या सुमारास ते लघुशंकेसाठी उठल्याने घराच्‍या गॅलरीत आले असता त्‍यांना कंचन मेडिकलसमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी उभी दिसली होती. या गाडीत दोघे जण गाय टाकत होते. त्‍यामुळे चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, गाय-वासरीचा शोध सुरू आहे.