घरावर आकडा टाकून वीज चोरत होता, अचानक आले पथक… तेव्‍हा त्‍याने जे केले ते पाहून पथकही हैराण!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरावर आकडा टाकून वीज चोरणाऱ्यास महावितरणच्या पथकाने रंगेहात पकडले. मात्र पथकालाच दमदाटी केल्याचा प्रकार आमखेड (ता. चिखली) येथे समोर आला आहे. चिखली ग्रामीण वितरण केंद्रातील आसाराम लहाने (३६) यांनी या प्रकरणात चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्याकडे आमखेड व अंबाशीची जबाबदारी आहे. काल, २३ ऑगस्टला सकाळी १० च्या सुमारास …
 
घरावर आकडा टाकून वीज चोरत होता, अचानक आले पथक… तेव्‍हा त्‍याने जे केले ते पाहून पथकही हैराण!; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरावर आकडा टाकून वीज चोरणाऱ्यास महावितरणच्‍या पथकाने रंगेहात पकडले. मात्र पथकालाच दमदाटी केल्याचा प्रकार आमखेड (ता. चिखली) येथे समोर आला आहे.

चिखली ग्रामीण वितरण केंद्रातील आसाराम लहाने (३६) यांनी या प्रकरणात चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यांच्‍याकडे आमखेड व अंबाशीची जबाबदारी आहे. काल, २३ ऑगस्‍टला सकाळी १० च्‍या सुमारास ते श्रावण नारायण शिराळे, सौ. अशु प्रकाश खरात, सिध्दोधन मनोहर गवई, अजय दिलीप ज्ञाल्टे या पथकासह आमखेडला गेले होते. गावातील भागवत शेषराव भाकडे याच्‍या घरावर आकडा टाकल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्‍यांनी घरासमोर जाऊन विचारपूस केली. तुम्ही विद्युत बिलाची थकबाकी भरलेली नाही, असे भाकडेला सांगितले असता त्‍याने वसुलीची यादी लहाने यांच्‍या हातातून हिसकावून फेकून दिली. चिखली पोलिसांनी भाकडेविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.