खामगावच्‍या एमसीजी स्पिनर्स कंपनीने माजी आमदाराला ८४ लाखांनी गंडवले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या एमसीजी स्पिनर्स या कंपनीने गंगापूरचे (जि. औरंगाबाद) माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या कंपनीची ८४ लाख रुपयांची फसवणूक केली. माने यांच्या कंपनीकडून एमसीजी स्पिनर्सने कॉटनच्या गाठींची खरेदी केली होती. मात्र पैसे द्यायची वेळ आली तेव्हा एमसीजी स्पिनर्सने माने यांच्या कंपनीला निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांचे चेक दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने …
 
खामगावच्‍या एमसीजी स्पिनर्स कंपनीने माजी आमदाराला ८४ लाखांनी गंडवले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या एमसीजी स्पिनर्स या कंपनीने गंगापूरचे (जि. औरंगाबाद) माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या कंपनीची ८४ लाख रुपयांची फसवणूक केली. माने यांच्या कंपनीकडून एमसीजी स्पिनर्सने कॉटनच्या गाठींची खरेदी केली होती. मात्र पैसे द्यायची वेळ आली तेव्हा एमसीजी स्पिनर्सने माने यांच्या कंपनीला निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांचे चेक दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने माने यांचे सहकारी सुरेश गांधी यांनी औरंगाबादच्या वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून एमसीजी स्पिनर्सच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण…
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात किसान ॲग्रो इंडस्ट्रीज व आनंद कॉटजीन प्रा. लि. या कंपन्या आहेत. यातील किसान ॲग्रो कंपनीत गंगापूरचे माजी आमदार आण्णासाहेब माने पाटील भागीदार आहेत. या कंपनीचा प्रशासकीय कारभार माने यांचे सहकारी शरद गांधी पाहतात. दुसऱ्या आनंद कॉटजीन या कंपनीचा कारभार सुरेश गांधी व त्यांचा मुलगा अनुप गांधी सांभाळतात. या दोन कंपन्यांकडून खामगावच्या एमसीजी स्पिनर्स या कंपनीने एक कोटी ५४ लाख ९८ हजार ६१५ रुपयांच्‍या कॉटनच्या गाठी खरेदी केल्‍या होत्या. यापैकी ७४ लाख ६५ हजार ८५३ रुपये एमसीजी स्पिनर्सने दिले नव्हते. हे पैसे २ टक्के व्याजाने एमसीजी स्पिनर्स कंपनीकडेच ठेवण्यात आले होते. व्‍याजासह होणाऱ्या ८३ लाख ६१ हजार ७५७ रुपयांचे धनादेश एमसीजी स्पिनर्सने माने यांच्या या दोन कंपन्यांना दिले. मात्र हे धनादेश निष्क्रिय असलेल्या बँक खात्याचे असल्याने ते वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या संचालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून एमसीजी स्पिनर्स खामगावचे नारायण छगनलाल गाडोदिया, विजय रामनिवास गाडोदिया, सीमा संतोष गाडोदिया व मीना राजेंद्र गाडोदिया अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.