क्रूझरच्या धडकेत वॉचमन ठार; बुलडाणा शहरातील अजिंठा रोडवर दुर्घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाला क्रूझरने उडवले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातला बुलडाणा- अजिंठा रोडवरील डॉ. खासबागे यांच्या फार्महाऊससमोर घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा काल, १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. सुधाकर म्हातारजी शेळके (६५, रा. डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा) यांच्या जावयाने दिलेल्या तक्रारीनुसार अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रूझरचालक …
 
क्रूझरच्या धडकेत वॉचमन ठार; बुलडाणा शहरातील अजिंठा रोडवर दुर्घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाला क्रूझरने उडवले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातला बुलडाणा- अजिंठा रोडवरील डॉ. खासबागे यांच्या फार्महाऊससमोर घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा काल, १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. सुधाकर म्हातारजी शेळके (६५, रा. डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा) यांच्या जावयाने दिलेल्या तक्रारीनुसार अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रूझरचालक सय्यद इरफान सय्यद इस्माईल याच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर शेळके हे शिवसाई कॉलेज अजिंठा रोड येथे वॉचमन म्हणून कामाला होते. त्यांचा मुलगा श्याम हा डॉ. खासबागे यांच्या फार्महाऊसवर कामाला होता. पत्नीसह तिथेच राहत होता. ११ सप्टेंबरच्या रात्री साडेसातला सुधाकर शेळके हे डॉ. खासबागे यांच्या फार्म हाऊसवर त्यांच्या मुलाकडे जात होते. त्यावेळी बुलडाण्याकडून देऊळघाटकडे जाणाऱ्या क्रूझरने (क्र. एमएच २८ सीयू ००२३) त्यांना मागून जबर धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लद्धड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.