कोरोना पुरात वाहून गेलाय…दुसऱ्या दिवशीही कुणालाच बाधला नाही!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना वाहून गेल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. कालप्रमाणेच आजही एकालाही कोरोनाची बाधा न झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या रुग्णालयांत 15 रुग्ण बरे झाले आणि असाच कोरोना गायब राहिला तर जिल्हा कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी जिल्हावासियांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्कचा सतत वार, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 509 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सर्वच 509 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 108 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 509 अहवाल निगेटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 717764 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86876 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 479 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.