कारची दुचाकीला धडक; बँकेत पैसे भरायला जात असलेला तरुण गंभीर जखमी; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत बँकेत पैसे भरण्यासाठी जात असलेला पेट्रोलपंपाचा मॅनेजर गंभीर जखमी झाला. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास देऊळगाव मही- देऊळगावराजा रोडवरील असोला फाट्याजवळ घडली. काल, १२ ऑक्टोबर रोजी देऊळगाव राजा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किशोर रमेश लोखंडे (२४, रा. चिंचोली …
 
कारची दुचाकीला धडक; बँकेत पैसे भरायला जात असलेला तरुण गंभीर जखमी; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत बँकेत पैसे भरण्यासाठी जात असलेला पेट्रोलपंपाचा मॅनेजर गंभीर जखमी झाला. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास देऊळगाव मही- देऊळगावराजा रोडवरील असोला फाट्याजवळ घडली. काल, १२ ऑक्टोबर रोजी देऊळगाव राजा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

किशोर रमेश लोखंडे (२४, रा. चिंचोली बुद्रूक, ता. देऊळगाव राजा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर असोला फाट्यावरील शिवप्रयाग पेट्रोलपंपावर मॅनेजर आहे. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी किशोर दुचाकीने देऊळगाव मही येथे जात होता. त्याचवेळी देऊळगाव महीकडून देऊळगाव राजाकडे येणारी भरधाव अल्टो कारने (क्र. एमएच ३० एफ 3268) दुचाकीला जबर धडक दिली. यात किशोर गंभीर जखमी झाला. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी किशोरला तातडीने देऊळगाव राजा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जालना येथे हलविण्यात आले. किशोरच्या वडिलांनी काल देऊळगावराजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.