“ऑनलाइन’ अडचण येत असेल तर पीक नुकसानीची माहिती लेखी द्या; पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शेतकऱ्यांना दिलासा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ९० टक्क्यांच्यावर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे शेतकरी तक्रार करत आहेत. मात्र अडचणी येत आहेत. त्यामुळे आधीच हवालदील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही बाब पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या लक्षात येताच त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ऑनलाइन तक्रार देण्यात अडचण येत असेल तर नजिकच्या कृषी विभाग …
 
“ऑनलाइन’ अडचण येत असेल तर पीक नुकसानीची माहिती लेखी द्या; पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शेतकऱ्यांना दिलासा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ९० टक्‍क्‍यांच्‍यावर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे शेतकरी तक्रार करत आहेत. मात्र अडचणी येत आहेत. त्‍यामुळे आधीच हवालदील शेतकऱ्यांच्‍या तोंडचे पाणी पळाले आहे. ही बाब पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

ऑनलाइन तक्रार देण्यात अडचण येत असेल तर नजिकच्‍या कृषी विभाग कार्यालयात, संबंधित बँक शाखेत लेखी माहिती द्या, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. कृषी विभागाचे कार्यालय, संबंधित कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांच्‍याकडे ऑफलाइन नुकसानीची माहिती द्यावी. जेणेकरून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्यची मदत मिळेल. कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांची ऑफलाइन माहिती स्वीकारावी. कुणीही विमाधारक शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.