आरोग्‍य विभागाच्या नोकरीचे बनावट नियुक्‍तीपत्र दिले; तरुणाकडून उकळले ५४ हजार!, खामगाव तालुक्‍यातील भामट्यास अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोग्य विभागाच्या १० जागा वाढवून आल्या आहेत. त्या यादीत तुमचे नाव आहे. तुम्हाला खामगाव सामान्य रुग्णालयात नेमणूक द्यायची असेल तर दीड लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत तरुणाकडून ५४ हजार रुपये उकळणाऱ्या भामट्याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी काल, १५ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. सोपान चौके (२७, रा. पेंडका पातोंडा, ता. …
 
आरोग्‍य विभागाच्या नोकरीचे बनावट नियुक्‍तीपत्र दिले; तरुणाकडून उकळले ५४ हजार!, खामगाव तालुक्‍यातील भामट्यास अटक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोग्य विभागाच्या १० जागा वाढवून आल्या आहेत. त्या यादीत तुमचे नाव आहे. तुम्हाला खामगाव सामान्य रुग्णालयात नेमणूक द्यायची असेल तर दीड लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत तरुणाकडून ५४ हजार रुपये उकळणाऱ्या भामट्याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी काल, १५ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. सोपान चौके (२७, रा. पेंडका पातोंडा, ता. खामगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

रौनक विजय पलघामोल (२८, रा. जुने आरटीओमागे, मलकापूर रोड, बुलडाणा) याने या प्रकरणात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बीएस्सी मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण झालेल्या रौनकने २०१९ मध्ये आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या असता ब्लड बँक अधिकारी या पदासाठी अर्ज केला होता. २०२० मध्ये त्यासाठी परीक्षा झाली होती. ९ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षेचा निकाल लागला. मात्र यात तरुणाची निवड झाली नव्हती. ११ सप्टेंबर रोजी सोपान चौके याने त्‍याच्‍या मोबाइलवर फोन केला व म्हणाला, की आरोग्य विभागाच्या भरतीत शासनाकडून पुन्हा १० जागा वाढवून आल्या आहेत. त्यात तुमचे नाव आहे. तुम्हाला खामगाव येथे नेमणूक हवी असेल तर एक ते दीड लाख रुपये लागतील नाहीतर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करावी लागेल किंवा तुमचे नाव वेटिंगमध्ये राहील. त्याच दिवशी संध्याकाळी रौनक आरोपीच्या पेंडका पातोंडा येथील घरी गेला. तरुणाने ५० हजार रुपये आरोपी सोपान चौकेजवळ दिले. चौकेने खोटे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर चौके याने जॉयनिंग किटसाठी पुन्हा ४२०० रुपये मागितले. तरुणाने तेही पैसे गुगल पेद्वारे चौके याला दिले. दोन दिवसांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रौनकने पोलिसांत तक्रार दिली. खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काल सोपान चौके याला अटक केली आहे.