आमदार आकाश फुंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याचा निषेधार्थ खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी २५ ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनात कोरोनाविषयक नियमांचा भंग करण्यात आल्याने आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्यासह १० ते १२ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री राणेंना अटक …
 
आमदार आकाश फुंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याचा निषेधार्थ खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी २५ ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनात कोरोनाविषयक नियमांचा भंग करण्यात आल्याने आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्यासह १० ते १२ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री राणेंना अटक करण्यात आल्यानंतर खामगाव शहरात ठिकठिकाणी आ. फुंडकर यांच्‍या नेतृत्त्वात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. यावेळी भाजप नेते, कार्यकर्त्यांना कोरोनाविषयक नियमांचे भान उरले नव्हते. कार्यकर्त्यांनी मास्क परिधान केला नव्हता. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाने उल्लंघन केले असा ठपका शहर पोलिसांनी ठेवला आहे. शहर पोलीस ठाण्यात काल, २६ ऑगस्ट रोजी आमदार फुंडकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.