आधी पाळत, नंतर झडप… झडतीत चॉकलेटने भरलेली बॅग… पण चॉकलेट फाेडले तर आढळला गांजा!; पावणेतीन लाख रुपयांचा गांजा बुलडाण्यात पकडला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी पाळत ठेवली, नंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. पण त्याच्याकडील झडतीत बॅगमध्ये आढळले चक्क चॉकलेट… सुरुवातीला पोलीसही हैराण… एवढी मोठी कारवाई या चॉकलेटसाठी होती का… पण हा संभ्रम काहीच क्षण टिकला. कारण चॉकलेट फोडले तेव्हा दिसून आला त्यात दडवलेला गांजा..! बॅगमध्ये ४० किलो गांजा अशाप्रकारे लपविण्यात आला होता. ४२ …
 
आधी पाळत, नंतर झडप… झडतीत चॉकलेटने भरलेली बॅग… पण चॉकलेट फाेडले तर आढळला गांजा!; पावणेतीन लाख रुपयांचा गांजा बुलडाण्यात पकडला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी पाळत ठेवली, नंतर पोलिसांच्‍या पथकाने त्‍याच्‍यावर झडप घातली. पण त्‍याच्‍याकडील झडतीत बॅगमध्ये आढळले चक्‍क चॉकलेट… सुरुवातीला पोलीसही हैराण… एवढी मोठी कारवाई या चॉकलेटसाठी होती का… पण हा संभ्रम काहीच क्षण टिकला. कारण चॉकलेट फोडले तेव्‍हा दिसून आला त्‍यात दडवलेला गांजा..! बॅगमध्ये ४० किलो गांजा अशाप्रकारे लपविण्यात आला होता. ४२ वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या मुसक्‍या बुलडाणा शहर पोलिसांनी काल, २ सप्‍टेंबरला रात्री साडेअकराच्‍या सुमारास आवळल्या. चिखली रोडवरील सहकार विद्यामंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली.

आरोपी मूळचा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील राहणारा असून, सध्या तो ठाणे येथे राहतो. बारकू शंकर पटेल असे त्‍याचे नाव आहे. काल रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती सहकार विद्यासमोर उभा असून, त्याच्याजवळ ४ प्रवाशी बॅग आहेत. बॅगमध्ये गांजा आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी लगेच एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या नेतृत्वातील एक पथक आरोपीला पकडण्यासाठी सहकार विद्या मंदिराकडे रवाना झाले. रात्री साडेअकरा वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला. गांजाची किंमत २ लाख ८१ हजार रुपये असल्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारकूने गांजा कुठून आणला? तो कुठे घेऊन जात होता, याचा तपास बुलडाणा शहर पोलीस करत आहेत.