तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला ! अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

 
dfghj

मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती. बेडेकर ब्रँड उभा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांसोबतच सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये  बेडेकर नाव पोहोचले आहे. त्याचे श्रेय अतुलजींना जाते. त्यांच्या निधनाने एक ध्येयनिष्ठ उद्योजक गमावला आहे. त्यांच्या  कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.