पत्नीचा न्यूड व्हिडिओ ठेवला स्टेटसवर..!; विकृत पतीचा कारनामा

 
file photo
मुंबई ः एका नवऱ्याचा विकृत कारनामा समोर आला आहे. त्रासाला कंटाळून माहेरी गेलेली पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेने याप्रकरणाची तक्रार मुंबईच्या कुरार पोलिसांत दिली असून, पतीसह सासू, सासरे, दीर, भावजय व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या क्रांतीनगरातील गणेश चाळीत राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. २०१५ तिचा विवाह ला होता. लग्नानंतर तुझ्या वडिलांनी श्रीधन कमी दिले असे म्हणत सासरचे लोक तिचा छळ करत होते व टोमणे मारत होते. २०१६ मध्ये ती गरोदर असताना पतीने मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पुन्हा गर्भधारणा होऊन तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन मुलांना सांभाळत असताना घरकामात उशीर व्हायचा म्हणून सासरचे तिचा छळ करीत होते.

अखेर त्रासून ती माहेरी आली होती. काही दिवसांनंतर पतीसह ती वेगळे राहू लागली. मात्र तरीही पतीतिला छळत होता. ती अंघोळ करत असताना पतीने तिचा न्यूड व्हिडिओ काढला. पतीचा त्रास असह्य झाल्याने पुन्हा ती पुन्हा माहेरी गेली. तेव्हा पती तिला फोन करून परत येण्यासाठी न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. ५ जानेवारी २०२२ रोजी त्याने पत्नीचा अंघोळ करतानाचा न्यूड व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून व्हायरल केला. त्यामुळे तिने मुंबईच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.