काय राजेहो... बुलडाण्यातील क्लास वन अधिकार उघड्यावरच करतात सू......! प्रशासकीय इमारतीत सुविधांचा अभाव

 
Buldana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या अनेक दिवसांपासून बुलडाण्यातील प्रशासकिय इमारतीचे स्वच्छतागृह बंद आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना उघड्यावरच लघुशंकेसाठी जावे लागत आहे. एखादा मोठा अधिकारी इमारतीच्या मागे आडोशाने लघुशंका करत असेल तर आता काय म्हणावे..तुम्हीच सांगा....
जिल्हा मुख्यालयातील प्रशासकिय इमारतीत कामकाजा करीता जिल्हाभरातील शेकडो अधिकारी या ठिकाणी जमतात. या इमारतीमध्ये शासन सुविधा पुरविणारे कित्येक विभाग आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांची देखील वर्दळ या भागात पाहायला मिळते. सुविधा, न्याय, योजना पुरवणाऱ्या शासन दालनातच प्राथमिक सुविधांचा प्रचंड अभाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इमारतीमधील स्वच्छतागृह बंद आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणारी अडचण देखील पाहायला मिळतेय. स्वच्छतागृह बंद असल्यामुळे त्यांना उघड्यावरच लघुशंकेसाठी जावे लागते.
प्रशासकीय सेवकांना होणाऱ्या अडचणीं कदाचित वरिष्ठांच्या दबावामुळे समोर येत नाहीत. मात्र त्यांची ओरड लपलेली नाही. साधारणतः सकाळी १० ते सायंकाळी ५ असा कार्यालयीन काम lकाजाचा वेळ असतोच. त्यामध्ये एक तास जेवनासाठी मिळतो. दरम्यान सर्वसाधारपणे लघुशंकेाला किमान दोन तीन वेळेस जावे लागतेच.. मात्र याठिकाणी स्वच्छता गृहच कोंडलेले आहेत,त्यामुळे इच्छा नसतानाही उघड्यावर जावे लागते.. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे...