लग्न करायचेय..? आधी तुमच्या डॉक्टरांची भेट घेऊन "हे' विचाराच...

 
file photo
लग्न म्हणजे आनंदाची उधळण. लग्न ठरल्यावर घरच्यांची तसेच नवरा- नवरीचीही धावपळ सुरू होते. आयुष्यातला हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी सर्वच गोष्टींचे नियोजन केले जाते. खरेदीसाठी सुद्धा सूक्ष्म नियोजन  करावे लागते. लग्न ठरल्यावर जेवढा आनंद असतो तेवढेच प्रश्नही मुलींना पडतात. सेक्सुअल आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न मुलींना पडतात. त्या प्रश्नांचे निराकरण लग्नाआधी करणे अतिशय महत्त्वाचे असते. गायनॉकॉलॉजिस्ट किंवा स्‍त्री रोग तज्‍ज्ञांना भेटून मनमोकळेपणाने प्रश्न विचारलेच पाहिजे...
  • लग्नाआधी काही टेस्ट करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. लग्नाआधी नवरा- बायकोच्या ब्लड रिलेटेड सर्व चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
  • मुलींनी मासिक पाळी संदर्भातल्या सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे. मुलींची मासिक पाळी ही वेदनादायक आणि अनियमित असेल तर याबद्दल डॉक्टरला सांगितले पाहिजे. डॉक्टर यावर योग्य ते उपाय सुचवू शकतात.
  • मुलींच्या मनात शारीरिक संबंधाबाबत अनेक शंका असतात. लग्नानंतरचा तो पहिला अनुभव कसा असेल? आपल्याला ते जमेल का असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात येतात. शारीरिक संबंधा दरम्यान सुरक्षेची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला काही प्रश्न निर्माण होत असतील तर डॉक्टरांपेक्षा चांगलं आणि विश्वासू उत्तर कोणीच देणार नाही. संकोच न करता बिनधास्तपणे शंका निरसन करून डॉक्टरांशी बोलावे.
  • गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा शारीरिक संबंधा दरम्यान कंडोमची गरज असते का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना भेटून या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. डॉक्टरांना प्रश्न विचारताना संकोच करू नका.