व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची केली मागणी!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागणी योग्य, सकारात्मक विचार करू..!
 
Bxbxb
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी आज,४ जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, आगामी पावसाळी अधिवेशनात त्याची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी" आपली मागणी योग्य आहे, तिचा सकारात्मक विचार करू" असा शब्द मुख्यमंत्र्यांनी अनिल म्हस्के यांना दिला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.
 महाराष्ट्रातील ८५ टक्के पत्रकारांचा पगार २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी पत्रकारांना जोड व्यवसाय करणे आवश्यक आहे. परंतु जोड व्यवसाय करायचा असेल तर बँका कर्जपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे पत्रकार बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत आहेत. राज्यात विविध घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ आहेत, त्याच धर्तीवर पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनिल म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली. आगामी पावसाळी अधिवेशनातच त्याची घोषणा यावी ही बाब त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे लावून धरली. आपली मागणी योग्य आहे, या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल असा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. आमदार संजय गायकवाड यांनीदेखील पत्रकारांच्या या मागणीला समर्थन देत कल्याणकारी महामंडळाची गरज मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.