पोर्न व्हिडिओ दाखवून पत्‍नीवर अनैसर्गिक अत्याचार! लग्नाच्या दोन महिन्यांतच तिने भोगल्या नरकयातना...

 
महिलेचा छळ
पुणे : नवऱ्याने बायकोला अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना नाशिक शहरात समोर आली आहे. याप्रकरणी नवविवाहितेने माहेरी येऊन पुण्याच्या देहूरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीवरून पतीसह सासू दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये विवाहितेचे लग्न झाले होते. लग्नानंतर विवाहितेचा नवरा तिला रात्री पॉर्न फिल्म दाखवत होता व अनैसर्गिक पद्धतीने जबरदस्ती संभोग करीत होता. याशिवाय तिचे सासू- सासरे तिला तू काळी आहे. बुटकी आहे, असे बोलून सतत टोमणे देत होते. २८ ऑगस्ट २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे हा प्रकार घडला. पतीने नवविवाहितेला नरकयातना  दिल्या. तिची इच्छा नसताना तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले, असे तक्रारीत म्हटले आहे.