दोन जावांचा एकमेकींच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप!
पुण्याच्या राजगड पोलिसांनी दोघींच्या नवऱ्याविरुद्ध तसा गुन्हा दाखल केला आहे. भोर तालुक्यातील एका गावात हा प्रकार समोर आला आहे. तक्रार देणाऱ्या महिला चुलत जावा आहेत. त्यातील एकीने तिच्यावर शेतातील गोठ्यात बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. १० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान उसाला पाणी देण्यासाठी ती गेली असता चुलत दिराने आधी विनयभंग केला. त्यानंतर दोन साथीदारांसोबत येऊन तिच्यावर शेतातील गोठ्यात आळीपाळीने बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
याच प्रकरणातील मुख्य संशयिताच्या पत्नीने पीडित महिलेच्या पतीवरही बलात्काराचा आरोप लावला आहे. ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान राहत्या घरी आणि लॉजवर नेऊन त्याने वारंवार बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे दोघींच्या भांडणात नवरोबांचे कारनामे समोर आल्याने पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.