सुपारी चोरासाठी हा कार्यक्रम योग्य...; राणेंनी पातळी सोडली!

 
जळगाव ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र, भाजप नेते नीलेश राणे यांनी आज, ७ नोव्‍हेंबरला व्टिटरवर केलेल्या वक्तव्यामुळे जळगावचे राजकारण पेटले आहे. शिवसेना उपनेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर राणेंनी पातळीवर सोडून टीका केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक खवळले असून, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रत्येक तालुक्‍यातील पोलीस ठाण्यात राणेंविरुद्ध तक्रारी देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. ठिकठिकाणी आंदोलनांची तयारीही सुरू आहे.
"सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला XXसारखं XXXपेक्षा या XXXX गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे.' अशी जहरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे. गुलाबराव पाटील यांनी नशिराबादेतील (जि. जळगाव) एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर नीलेश राणे यांनी व्टिट करत टीका केली. मात्र टीका करताना पातळी सोडल्याने शिवसैनिकांचा संताप झाला आहे.