तरुणी टेकडीवर बर्थ डेला गेली...मित्राने जंगलात नेऊन बलात्‍कार केला!

 
पुणे (पुणे लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून २२ वर्षीय तरुणीवर मित्रानेच बलात्‍कार केला. पुण्याच्या तळजाई टेकडीवर ५ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून १९ वर्षीय तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम सीताराम शिंदे (रा. धनकवडी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तू पार्टीला आलंच पाहिजेत, तळजाईच्या शेवटच्या बसथांब्‍यावर ये, अशी गळ शुभमने पीडित तरुणीला घातली. त्‍यामुळे तरुणी त्‍याच्‍या वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. शुभमने तिला टेकडीवर नेले. तिथे शुभम मित्रासोबत दारू पित बसला. त्‍यामुळे तरुणी मोकळ्या जागेत जाऊन बसली. थंडी अधिक असल्याने ती तिथेच झोपली. त्‍यानंतर शुभम तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्‍कार केला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. पीडितेने सहकारनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुभमला अटक केली.