तरुणीने आंधळ्या नवऱ्यासोबत लग्न केले, पण...

तिच्या डोक्‍यात शिजत होता वेगळाच कट!
 
file photo
पुणे : लग्न झाल्यानंतर सात महिन्यांत नवरीने घरातून पळ काढल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. जाता जाता कपाटातील दागिने, सोने-नाणे सर्वच घेऊन गेली. फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर अंध नवऱ्याने पोलिसांत धाव घेतली. पुणे पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेली तक्रारदार व्यक्ती व्यक्ती आरबीआयमध्ये नोकरीला आहे. अंध असल्याने लग्न जमत नव्हते. त्यामुळे मध्यस्थांमार्फत लग्न झाले. सारिका बंब या तरुणीसोबत सात महिन्यांपूर्वी त्याने  लग्न केले. लग्न करायचे असेल तर मुलीच्या कुटुंबियांना पैसे द्यावे लागतील, असेही मध्यस्थांनी त्‍याला सांगितले. त्यामुळे आठ लाख रुपये देऊन काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने सारिकासोबत लग्न केले होते. लग्न होऊन सात महिने झाले. सात महिन्यांचा संसार केल्यानंतर मुलीने घरातून दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला. तिच्या नवऱ्याने तिच्याशी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही ती परत आलीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवऱ्याने पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरून तिच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.