विकृतीचा कळस! मंदिराच्या दानपेटीत टाकत होता वापरलेलं कंडोम; पोलीस चौकशीत सांगितले हे धक्कादायक कारण!!

 
बंगरूळु ः विकृत मनोवृत्तीची माणसे काय चाळे करतील याचा काही नेम नाही. कर्नाटकमध्ये एका विकृत व्यक्तीचा कारनामा समोर आला असून, तो मंदिराच्या दानपेटीत चक्क पैशांएेवजी वापरलेले कंडोम टाकत असल्याचे समोर आले आहे. देवदास देसाई असे या विकृत व्यक्तीचे नाव असून, कर्नाटक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दानपेटीत कंडोम टाकण्याचे कारणही सांगितले. ते ऐकून पोलीसही हैराण झालेत. प्रभू येशूचा संदेश पोहोचवण्यासाठी मी हे काम करत होतो. मला माझ्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही, असेही तो म्हणाला. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. वापरले कंडोम दानपेटीत टाकून तो फरार होत होता. बंगरूळुतील अनेक मंदिरांच्या दानपेटीत तो हे वापरलेले कंडोम टाकत होता.

२७ डिसेंबर रोजी कोरजाना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यात आरोपीचा चेहरा दिसून आला. त्याआधारे पोलिसांनी देवदास देसाई याला अटक केली. अनेक मंदिरांच्या दानपेटीत कंडोम टाकल्याची त्याने कबुली दिली. मंदिराच्या दानपेटीत कंडोम फेकल्यावर लोक अपवित्र होऊन आपल्या धर्माकडे आकृष्ट होतील यासाठी तो हे करीत होता, असे त्याने सांगितले.

मंदिरच नव्हे तर मशीद आणि गुरुद्वारामध्येसुद्धा कंडोम फेकल्याचे त्याने सांगितले. प्रभू येशूशिवाय कोणताही ईश्वर नाही, असा बायबलचा संदेश आहे. अशुद्ध वस्तू या अपवित्र ठिकाणीच टाकाव्यात, असा बायबलचा संदेश असल्याने कंडोम मंदिरात फेकत होतो. मला याचा पश्चाताप नाही, असेही त्याने पोलिसांना सांगितले.