रात्र झाली आहे, एकटी घरी जाऊ नको... म्हणत मुक्कामी थांबवले अन् जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, निशांत हरीश चंदनानी (३४, रा. रतलाम,मध्यप्रदेश) हा व्यवसायाने इंजिनियर असून त्याचा घटस्फोट झाला आहे. नोकरीनिमित्ताने तो पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. तक्रारदार ३२ वर्षीय तरुणीसुद्धा इंजिनियर असून तिचाही घटस्फोट झाला आहे. दोघांना दुसरे लग्न करायचे असल्याने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर त्यांनी नोंदणी केली होती. त्यावरून दोघांची ओळख झाली. निशांतने तिला लग्नाचे आमिष दाखविले.
दोघांची चांगली ओळख झाली. त्यानंतर निशांतने तिला त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत त्याच्या घरी बोलावले. पार्टी रात्री उशिरा संपल्यावर तू एवढ्या रात्री जाऊ नको. उद्या सकाळी जा, असे म्हणून त्याने तिला घरी थांबवून घेतले. त्यानंतर रात्री त्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र तो लग्नाला नकार देऊ लागला. अखेर पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी निशांतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.