पोलीस कॉन्स्टेबलचा वकील महिलेवर बलात्कार, लग्न करतो म्हणत होता...

 
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने वकील महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. वकील महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा आरोप असलेल्या पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार २९ वर्षीय वकील महिला आणि लक्ष्मण गंगाधर राऊत (३३, रा. पत्राचाळ, मूळ रा. लोणी काळभोर) यांची मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाली होती. लक्ष्मण राऊत हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. लक्ष्मणने वकील महिलेचा मोबाइल नंबर मिळवून तिच्याशी बोलणे सुरू केले.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लक्ष्मण वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवू लागला. लक्ष्मणने तिला देहूरोड पिंपळे निलख येथील एका लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र तो लग्नाला नकार देऊन वकील महिलेला टाळू लागला. फसवणूक झाल्याने वकील महिलेने  चतुः श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून लक्ष्मणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.