मोठ्या बहिणीने लहानीला तरुणासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; कानफटात लगावल्यानंतर लहानीने उचलले नको ते पाऊल!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुलींचे वडील रिक्षाचालक तर आई खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. ३ जानेवारीला मुलीचे आईवडील कामासाठी निघून गेले. तिची मोठी बहीण(१८) कॉलेजला गेली. दुपारी ती कॉलेजहून घरी परतली तेव्हा घरात तिला गल्लीत घरासमोरच राहणारा अर्पित भगीरथ माथुर्या (१८) हा छोट्या बहिणीसोबत दिसला.
अर्पित मुलीच्या घरासमोरच त्याच्या मामाच्या घरी राहत होता. मोठी बहीण आल्याचे कळताच अर्पित मागच्या दरवाजातून पळून गेला. त्यानंतर मोठीने लहानीला या प्रकारचा जाब विचारत रागावत तिच्या कानाखाली वाजवली. तेवढ्यात अर्पित मुलीच्या घरासमोर आला आणि अंगणात उभ्या असलेल्या लहानीला घेऊन पसार झाला.
मोठीने आई- वडिलांना ही माहिती दिल्यानंतर ते घरी आली. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. सौरभ सुरेंद्र गणवीर (२०, रा. इंदिरा मातानगर, नागपूर) याने सुद्धा अर्पित आणि मुलीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचे मुलीच्या आई- वडिलांना कळले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी संध्याकाळी यशोदानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अर्पित व सौरभविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.