१५ वर्षीय मुलीला टेरेसवर नेऊन शिक्षकाचे घाणेरडे कृत्य!
Nov 3, 2021, 00:24 IST
पुणे ः १५ वर्षीय मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या ५२ वर्षांच्या शिक्षकाला पुण्याच्या वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. वानवडी भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
संजय रमेश शर्मा (रा. जगतापनगर, वानवडी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. ३ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर दरम्यान शिक्षकाने त्याच्या घराच्या टेरेसवर मुलीला वारंवार नेऊन हे घाणेरडे कृत्य केले. कुणाला काही सांगायचे नाही, असे ताे पीडित मुलीला धमकावत होता. त्रास होऊ लागल्याने मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.आरोपीला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.