STATE NEWS किंचाळण्याचा आवाज ऐकताच पत्नी घराबाहेर आली! चिंचेच्या झाडाखाली पती रक्ताच्या थारोळ्यात दिसला..! नेमंक काय झालं..

 
vhgjk
जालना(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पती घराबाहेर चिंचेच्या झाडाखाली बाजेवर मोबाईल पाहत बसले होते. पत्नी घरात घरकाम कळत होती. अचानक पतीच्या किंचाळण्याचा आवाज पत्नीच्या कानावर आला, पत्नी घाबरत घाबरत घराच्या बाहेर आली..पुढे पाहते तर काय.. पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता अन् सारंच संपलेल होत...जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी गावात ही हादरून टाकणारी घटना घडली आहे.
 

जानेफळ दाभाडी येथील काका पुतण्यांमध्ये ७ - ८ वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता.  याच वादातून काका शिवाजी जयाजी मिसाळ(५०) याने पुतण्या अंबादास बाबुराव मिसाळ (३५) याचा खून केला. अंबादास ची काकू म्हणजेच शिवाजीची बायको या हत्याकांडाला प्रोत्साहन देत होती. गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून हे हत्यांकांड करण्यात आले.

  घटनेच्या दिवशी अंबादास त्याच्या घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली बाज टाकून मोबाईल पाहत होता. त्याची पत्नी घरात घरकाम करीत होती. दुपारी अडीच चा सुमारास अंबादास चा काका शिवाजी कुऱ्हाड घेऊन तिथे पोहचला, त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती. कोणतीही चर्चा न करता शिवाजी ने अंबादास च्या डोक्यात आणि गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. बेसावध असलेल्या अंबादास ला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. नवऱ्याचा किंचाळण्याचा आवाज एकून अंबादास ची पत्नी बाहेर आली मात्र तोपर्यंत सार संपलेल होते. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पत्नीने आणि स्थानिकांनी अंबादास ला रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृतक अंबादास च्या पत्नीने याप्रकणाची तक्रार दिली असून पोलिसांनी त्याच्या काका व काकू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.