STATE NEWS खळबळजनक! तंबाखू न दिल्याने चाकूने पोटात सपासप वार!

 
kdkdk
पुणे ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): व्यसनांच्या आहारी गेलेला माणूस कधी काय करेल याचा नेम नाही..असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तंबाखू न दिल्याने एका युवकाच्या पोटात सपासप चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात बिचारा युवक गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली.
 

सूरज परतने(३८, रा.परभणी) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. सूरज पुण्यात केटरिंग व्यवसायात काम करतो. रात्री दहाच्या सुमारास तो पुण्यातील रेल्वेस्टेशन जवळील भुयारी मार्गातून जात होता.

यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याला तंबाखू मागितली. सूरज जवळ तंबाखू नसल्याने त्याने तंबाखू नसल्याचे सांगितले. या बाबी वरून मागणाऱ्याला त्याचा राग आला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात अनोळखी व्यक्तीने सूरजच्या पोटात सपासप चाकू खुपसला. त्यानंतर अनोळखी व्यक्ती पसार झाला.

 रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या वेळी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. सूरजच्या जबाबावरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..