STATE NEWS खळबळजनक! ६५ वर्षीय वृध्द महिलेवर वासनांध तरुणाची वाईट नजर पडली! निर्जनस्थळी नेऊन बलात्कार

 
अकोला(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्याशेजारील अकोला जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या एका भामट्याने आईसमान असलेल्या ६५ वर्षीय वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. बोरगाव मंजू तालुक्यातील दाळंबी शिवारात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
  प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळ बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. जिवे मारण्याची धमकी देत ६५ वर्षीय वृध्द महिलेला अज्ञात स्थळी नेण्यात आले. तिथे जबरदस्ती बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार मनोज केदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीचा शोध लावण्यासाठी विविध पथके गठित केली आहेत. या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेतले असून आरोपीला सोडणार नाही असे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले.