State News : विकृत चोर... महिला, मुलींचे अंतर्वस्त्र चोरायचा.. "असा' पकडला रंगेहात!

 
कोल्हापूर : आतापर्यंत लाखो, करोडोंची लूट करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या कहाण्या आपण वाचल्या असतील. कोल्हापूर जिल्ह्यातून एका विकृत चोरट्याचा अजबच कारनामा समोर आला आहे. दीड वर्षापासून तो महिलांची बाहेर वाळत घातलेली अंतर्वस्रे चोरायचा. न्यायाधीशांच्या निवासस्थानी वाळत असलेली अंतर्वस्त्रे चोरताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोती शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून शहरातील महिला, मुली अंतर्वस्त्र चोरीला जाण्याच्या प्रकाराने हैराण होत्या. मात्र याबाबत तक्रार द्यायला कुणीही समोर आले नव्हते. दोन दिवसांपूर्वी गारगोटी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या न्यायाधीशांच्या  निवासस्थानीच अंतर्वस्त्रे चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांच्या निवासस्थानासमोरील सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाला.

या प्रकारानंतर न्यायाधीश मुल्ला यांनी घरासमोरील पार्किंगमध्ये २ जणांना गाडीत लपून बसायला लावले. पुन्हा काही अंतर्वस्त्रे बाहेर ठेवली. गाडीत लपून बसलेल्या दोघांना चोरट्यावर नजर ठेवायला सांगितली. पहाटे पाचला चोरटा अंतर्वस्त्रे चोरायला आला तेव्हा त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोरट्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली. दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी होत होता. तो महिला, मुलींचे अंतर्वस्त्र का चोरत होता, हे मात्र अजून समोर आले नाही.