STATE NEWS देवेंद्र फडणवीस होते म्हणून काम झाले! नाहीतर दहा पंधरा वर्षे अजून "हे" काम झाले नसते! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नेमक सांगितलं...

 
rkvp

अहमदनगर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आल. या धरणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ६ आणि नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्याला फायदा होणार आहे. एकूण १२५ गावांना पिण्यासाठी पाणी मिळेल तर  ६८८७१ हेक्टर शेतजमिनीचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. दरम्यान यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास गेल्याचे सांगितले.

गेल्या ५३ वर्षांपासून प्रकल्प रखडलेला होता.  त्यामुळे ८ कोटी रुपयांवरून सुरू झालेले बजेट ५ हजार कोटींवर गेले. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी यात जातीने लक्ष घालून प्रकल्पाच्या सुधारीत खर्चाला मान्यता दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली.नाहीतर अजून १० -१५ वर्षे अजून हे काम झाले नसते असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.