State News : जाहिरातीच्या शूटिंगला बोलावले... जबरदस्ती नग्न करून तसली ॲक्टिंग करायला लावली!; नवोदित मॉडेलची पोलिसांत धाव

 
मुंबई ः जाहिरातीच्या शूटिंगला बोलावून तरुणीकडून जबरदस्ती अश्लील व्हिडिओ चित्रित करून घेण्यात आल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनम चंद पिंजारी (२५, रा. मालाड पश्चिम, मुंबई) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये तिला सलोनी नावाच्या एका महिलेचा फोन आला होता. लेहंग्याच्या जाहिरातीचे शूट करण्यासाठी तिला मढ, मालाड पश्चिम, मुंबई येथे पाठविले होते. प्रत्यक्षात तरुणी जेव्हा शूटिंगसाठी तिथे पोहचली तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी तिला जबरदस्ती नग्न व्हायला सांगितले. तिथे उपस्थित एका तरुणालासुद्धा तिच्यासमोर नग्न व्हायला लावले.

तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने किसिंग सीन व शारीरिक संबंध करत असल्याची ॲक्टिंग करायला लावून व्हिडिओ चित्रीकरण केले. हे शूटिंग एका वेबसिरिजचे असल्याचे तिला नंतर कळले. ही वेबसिरिज एका साईटवर अपलोड करण्यात आली. भारतात परवानगी नसताना अश्लील व्हिडिओ चित्रित करून तरुणीची फसवणूक करण्यात आली, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. तक्रारीवरून सलोनी नावाची महिला व अनोळखी डायरेक्टरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.