धक्कादायक... चाकूचा धाक दाखवून महिलेवर रात्रभर लैंगिक अत्याचार

 
नाशिक : लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून ३५ वर्षीय युवक ३० वर्षीय महिलेला त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर घेऊन गेला. तिथे तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्‍याचार केला. १७ डिसेंबरच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला.
आझाद शेख (३५) असे आरोपीचे नाव आहे. महिलेला रस्त्यात गाठून त्‍याने सोबत येण्यास सांगितले. तिने नकार दिला असता मुलीच्या गळ्याला त्‍याने चाकू लावला. तिला लॉजवर नेले. तेथे रात्रभर तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केला. नंतर तिला मित्राच्या घरी नेऊनसुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्‍याने तिला सोडून पळ काढला. महिलेने सातपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. तो रेल्वेचे तिकिट काढून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्‍या आधीच त्याला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव करत आहेत.