धक्कादायक... लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल १० वेळेस बलात्कार; ट्रॅव्हल्स आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार

 
पुणे : वयाची २१ वर्षेही पूर्ण न केलेल्या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवले. शरीरसुख मिळविण्यासाठी तो एवढा हपापला होता की त्याने तिला लॉजवर तसेच त्याच्या मालकीच्या ट्रॅव्हल्समध्ये नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तब्बल ९ ते १० वेळेस त्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तेजस तात्याराव सरवदे (२०, रा. वसवडी, जि. लातूर) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तेजसची जवळची मैत्रीण होती. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. तेजसने तिला लग्नाचे आमिष दाखवून पुण्याच्या लांडेवाडी येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लातूर येथील लॉजमध्ये नेऊनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याशिवाय लांडेवाडी येथील भोसले पार्किंगमध्ये पार्क केलेल्या तेजसच्या मालिकीच्या ट्रॅव्हल्समध्ये नेऊन सुद्धा त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. भोसरी पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी तेजसला अटक केली आहे.